कहाणी लिवर ट्रान्सप्लांट ची
**ही कथा १००% सत्यघटना असून त्यात उल्लेख केलेली संपुर्ण घटना आणि डॉक्टरांचे तपशील तसेच सर्व माहिती पूर्णपणे सत्य आणि अत्यंत शास्त्रीय असून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली जनहितार्थ प्रसार करण्याच्या हेतूनं लिहिली आहे*.त्याचा प्रचार आणि प्रसार करावा.(MAKE IT VIRAL)
अधिक माहितीसाठी संपर्क *डॉ.निनाद देशमुख*
.(लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन)
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल* पुणे.
. *पालवी*
“ए ताई ठरलं तर मग.. आपण दोघींनी आई-बाबांची ३० वी ॲनिवर्सरी मस्त दणक्यात करायची. माझ्या डोक्यात बरेच ऑप्शन्स आहेत. आपण बोलू, पण आता ठेवते फोन .मला डान्स क्लास ला पोहोचायला हव. चल बाय ,ठेवते फोन” अस म्हणत स्पृहाने फोन ठेवला पण.
घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी स्पृहा माझं लग्न झाल्यावर एकदम केवढी जबाबदार पणे वागायला लागली स्नेहाच्या मनात धाकट्या बहिणीच कौतुक दाटून आलं .
याला आठवडा उलटला.मग मात्र आज आईकडे जायचंय अस ठरवून स्नेहा ;डबा पॅक करत रोहन ला म्हणाली “आज प्लीज तू स्वराला पाळणा घरातून आणशील ? मी येताना आईकडे जाऊन येईन” त्याचा होकार गृहीत धरत तिने चटकन पर्स घेतली आणि ऑफिस मध्ये संध्याकाळ ची वाट बघत भराभर तिची बोटं कॉम्प्यूटर वर चालू लागली.
नेहमीप्रमाणे आईकडे गेटमधून आत आल्याआल्या तिला काहीस खटकलंच. बाग सुकल्यासारखी दिसत होती. कायम बहरलेला प्राजक्त,फुललेला डवरलेला चाफा,गंधाळलेल्या जाई ,जुईच्या वेली अगदीच मलूल मलूल वाटत होत्या. त्यांना फुटणारी पालवी कुठेतरी खुरटली होती.वाढ खुंटलेली होती.तिच्या मनात अनामिक हुरहूर दाटली.
खरतर बागकाम केल्याशिवाय आणि टेबल टेनिस खेळल्याशिवाय बाबांचा दिवस कधीच संपायचा नाही.आज काय झालंय नेमक? तिच्या मनात पाल चुकचुकली.
“आई ,अग बाबा कुठे आहेत?” ती हॉल मधूनच ओरडली .तिला आईचा चेहरा थोडासा गंभीर वाटला. “अग, मी तुला फोन करणारच होते. “काय झालंय आई? बाबा कुठे आहेत? स्नेहान काळजी युक्त स्वरात आईला विचारलं.
काय सांगू तुला ; अगं जवळ जवळ दहा दिवस झाले यांच ना काहीतरी बिनसलंय. *पायांवर सतत सूज येत्ये. खूप थकल्यासारखे दिसत आहेत .वजन पण कमी झाल् आहे. आणि मला तर त्यांच्या डोळ्यात पिवळसर पणा जाणवतो*
तुला फोन केला नाही आधी , अग स्वरा लहान, तुझी उगाच धावपळ होते .तुझ्यामागे तुझे व्याप, तुझी नोकरी .पण आज आलीस ते बरं केलंस. ऐक आपले फॅमिली डॉक्टर
आज सकाळीच म्हणाले की बाबांच्या आजाराची लक्षणं जरा गंभीर वाटत आहेत. त्यांना शंका येते आहे..लिव्हर मध्ये काहीतरी बिघाड झाल्याची. त्यांनी सांगितले आहे की *दीनानाथ मधल्या डॉक्टर’ *निनाद देशमुखांना* ‘दाखवा ते ‘*लिव्हर स्पेशालिस्ट* ( Liver Specialist in Pune) आहेत. त्यांचा खूप चांगला अनुभव आहे अनेक पेशंट ना. पुढची ट्रीटमेण्ट ते देतील. तेव्हड्यात बाबा हाक मारून म्हणाले,” स्नेहा, उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीच आहे. पण मला काही झालं तर आईला सांभाळाल ना दोघी? माझं काही आता खरं वाटत नाही.अग सगळचथांबलय. मी आताशा टेबल टेनिस खेळत नाहीये की बागकाम करण्याइतकी सुद्धा ताकद नाहीये माझ्यात. *भयंकर अशक्तपणा आलाय.थोडस चालल तरी थकवा येतो*. “बाबा काही होणार नाहीये तुम्हाला. सायन्स इतक पुढे गेलंय! नक्की काहीतरी औषध असेल तुमच्या त्रासावर. तुम्ही पडा बरं. उद्या जायचंय ना डॉक्टरांकडे. मी डायरेक्ट तिथेच येते “स्नेहा म्हणाली.
दुसऱ्या दिवशी कानात प्राण आणून सगळेच ऐकत होते. डॉक्टर निनाद देशमुख सर्व लक्षणं अत्यंत एकाग्रपणे ऐकत होते.मात्र त्यानंतर गरजेच्या रक्ताच्या चाचण्या आणि M.R. I. रिपोर्ट वाचून मात्र त्यांनी अतिशय गांभीर्याने निदान केलं,” हा “लिव्हर सिरोयसिस* च” आहे. इतका काळ उसन अवसान आणून बसलेली जयंतरावांची पत्नी वासंती ; ती आता मात्र अक्षरशः गोंधळली, घाबरली गडबडली. तिच्या अंगाला सूक्ष्म थरथर जाणवायला लागली.”अहो डॉक्टर , यांनी आयुष्यात दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केला नाही .तुम्ही परत एकदा नीट पहा ना रिपोर्ट सगळेच.” खरं तर हाच प्रश्न स्नेहा आणि स्पृहाच्याही मनात पिंगा घालत होता.डॉक्टर देशमुख यांनाही आता हा प्रश्न सवयीचा झाला होता. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अनेक बाबींचा उलगडा करायला सुरुवात केली.
दारू हेच एकमेव कारण नाही लिव्हर सोरायसिस होण्याचं ;ते शांतपणे म्हणाले.तुमची एकंदरीत जीवन शैली आणि इतर अनेक ज्ञात अज्ञात कारणांच्यामुळे आता या आजाराचा प्रसार खूपच फोफावला आहे. . खरंतर लिव्हरमध्ये चरबीचा थर जमा होऊन *फॅटी लिव्हर* झाल्यामुळे ही व्याधी झाली आहे.
स्नेहाही मनातून हे सगळं ऐकून खूप घाबरली. परंतु वरवर तिला तसं दाखवून चालणार नव्हतं त्यात स्पृहाला आणि आईला पण आधार देणं गरजेचं होतं .पेशंट श्री. जयंत कुलकर्णी तर अत्यंत खालावलेल्या स्वरात म्हणाले , “म्हणजे आता सगळं संपलं म्हणायचं !मी पुढचा विचारच असा आत्तापर्यंत केलेला नव्हता. पण माझ्यामागे ‘ ही ‘ कशी जगेल? अजून लग्न व्हायचंय स्पृहाच ! सुदैवच म्हणायचं शिक्षण तरी पूर्ण झाल आहे.”
स्पृहा त्यांच्या अभिमानाचा विषय होती.
ते म्हणाले,” डॉक्टर कमीत कमी वेदना होतील असं पहा फक्त !”
आता नशिबात असेल तेव्हढे दिवस ढकलायचे,दुसरं काय करणार..प्रारब्ध म्हणायचं माझ.इलाज नाही त्याला कोणाचा.
“बाबा काहीतरी नका ना बोलू प्लीज”.स्नेहा काकुळतीला येऊन म्हणाली.डॉक्टर ,आम्ही आमच्या बाबांचे हाल होताना नुसतं पाहायचं का? काहीच इलाज नाही का याला?
डॉक्टर निनाद देशमुख यांनी जयंतरावांना पाणी दिलं आणि त्यांना धीर देत म्हणाले अजिबात काळजी करू नका , मि.कुलकर्णी. विज्ञान खूप पुढे गेले आहे. तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट ने नवीन आणि निरोगी जीवन मिळेल.कोणी उत्तम प्रकृती असलेला लिव्हिंग डोनर मिळतोय का पाहू आपण!
“पण *नवीन लिव्हर*, म्हणजे दुसऱ्या कोणाचे तरी लिव्हर बाबांना देता येईल डॉक्टर? तुम्ही खरं सांगत आहात ना? आणि त्यांनी माझे बाबा बरे होतील? पण असं कोणाचं लिव्हर मिळणार? आणि कुठे ?
तिचा प्रश्नांचा मारा ऐकून स्नेहाच म्हणाली, अगं हो !डॉक्टरांना बोलू दे, त्यांना संधी देशील का नाही काही बोलायची. मग डॉक्टरांनीच या गोष्टीचं सविस्तर वर्णन करायला सुरुवात केली .पहिल्यांदा म्हणजे तुमचे बाबा पूर्ण बरे होतील.अशा केस मध्ये *लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन* यशस्वी होण्याचे प्रमाण ९०% ते ९२% इतके आहे.
कारण तुम्ही अगदी वेळेत माझ्यापर्यंत पोचलात.
मात्र एक लक्षात घ्या आता या परिस्थितीत दुसरा कोणताच औषधउपचार लागू पडणार नाही तर *यकृताचे प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट* करायला लागेल. पण त्याचा उपयोग नक्की होईल. माझ्यावर विश्वास ठेवा .
आणि मि. कुलकर्णींचा *ब्लड ग्रुप मॅच होणारी 18 ते 50 वयोगटातील कोणतीही सुदृढ आणि निरोगी व्यक्ती स्वतःच्या लिव्हरचा काही भाग बिनधोकपणे दान देऊ शकते.अगदी कोणालाही* .
वासंती तातडीने म्हणाली ,”मी देईन माझ लिव्हर.मी त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही .
डॉक्टर शांतपणे समजावत म्हणाले,
“मी समजू शकतो; पण तुम्हाला थोडा हार्ट चा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे आपल्याला दुसरा कोणी तरी डोनर शोधायला लागेल. किंवा लिव्हर डोनर्स ची वेटिंग लिस्ट चेक करायला लागेल.
“कशाला हवी वेटिंग लिस्ट डॉक्टर? माझा आणि बाबांचा रक्तगट नक्की एकच आहे.
क्षणाचाही विलंब न लावता स्पृहा म्हणाली. मी तयार आहे माझ लिव्हर बाबांना द्यायला. बाबांना बर वाटलं पाहिजे. माझं काय व्हायचं ते होऊ दे!
मिस स्पृहा अहो कोणताही डॉक्टर असा कोणाच्या जीवाशी खेळ कसा करेल? तुम्हाला काहीही होणार नाही.
नीट समजून घ्या.मी तुम्हाला सांगतो ते नीट ऐका.कल्पना करा की *एखाद्या झाडाची फांदी एखाद्यावेळी कापली, तरी तिथे नवीन फांदी येते की नाही किंवा नवीन पालवी फुटते …अगदी नैसर्गिक पणे ! अगदी तसच असतं माणसाच्या लिव्हर च पण. म्हणजे कोणत्याही निरोगी माणसाच्या यकृताचा पण उजवा भाग आपण वैद्यकीय देखरेखीखाली कापला; तरी तरी तो डाव्या भागाकडून परत एकदा तयार होतो*. म्हणजे यकृत किंवा लिव्हर दोन ते अडीच महिन्यात परत पूर्ववत वाढते.अगदी निसर्गतः, त्याची
पुर्वावस्था त्याला परत प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही पूर्ण निर्धास्त राहा.लिव्हर चा काही भाग दान केल्यानंतरही काही काळातच तुमचे यकृत म्हणजे लिव्हर परत पहिल्या सारखेच आपोआप वाढेल आणि पूर्ववत होईल. तुम्ही पुन्हा एकदा अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकाल.
एवढ्या वेळात वासंती पुढे मात्र सगळं ब्रम्हांड फिरून आल होत.स्पृहा अजून फक्त एकवीस वर्षांची. तिचं सगळं आयुष्य तिच्यासमोर आ वासून उभ आहे. बाबांसाठी ती चटकन हो म्हणाली खरी,पण आपण तिचा बळी तर देत नाही ना?तिला काही झालं तर? ?तिला अपंगत्व आलं तर??? बुद्धीवर काही परिणाम झाला तर???
आणि तिचं लग्न संसार तिचे बाळंतपण आणि तिचं सायकॉलॉजी मधील करिअर… आणि शिवाय किती उत्तम नृत्य करते ती .ह्याच सगळ्या विचारांनी घेरून वसंतरावांना पण अतिशय अपराधी आणि अस्वस्थ वाटायला लागलं.
ते निर्धाराने म्हणाले , “डॉक्टर माझं काय व्हायचं ते होऊ दे; पण माझ्या स्पृहाच्या आयुष्य मी असं डावावर नाही लावू शकत. मला घरी जाऊ दे! माझ्या हातात आता खूप कमी वेळ आहे. मला पुढची सगळी सोय लावायला हवी. माझ काय व्हायचं ते होईल पण मी स्पृहा च आयुष्य धोक्यात नाही घालणार.तुमचे आभार डॉक्टर..पण आम्हाला घरी जाऊ द्या आता.
अत्यंत शांत पण ठाम स्वरात डॉ.देशमुख बोलले ,”तर मि. कुलकर्णी ,ऐकून तर घ्या.हे पहा अहो आत्तापर्यंत तीस वर्षात जगभरातल्या लाखो लोकांनी स्वतःच्या लिव्हरचा काही भाग दान केला आहे.आणि त्यानंतरही ते अगदी उत्तम प्रती चे आयुष्य जगत आहेत.लिव्हर डोनेट करणारे पण आणि ज्यांच्या शरीरात लिव्हर ट्रान्सप्लांट केलं ते पण!
तुमच्या लाडक्या लेकीला काहीही होणार नाही.आणि त्याची पूर्ण खात्री केल्याशिवाय आम्ही मुळात शस्त्रक्रिया करणारच नाही.अगदी निर्धास्त रहा.
” पण डॉक्टर आम्हाला थोडा वेळ द्या .आम्हाला विचार करू दे. एकीकडे वासंती आणि जयंतराव विनवत होते आणि दुसरीकडे स्पृहा मात्र पुढच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर विचारणा करण्यात मग्न झाली होती.निर्णय घ्यायला उशीर करणं म्हणजे रिस्क वाढवणं…हे तिच्या नीट लक्षात आलं होत.
“स्पृहा, दोन ते तीन दिवसात तुझ्या फिटनेसच्या तपासण्यांचे रिपोर्ट येतील.तू जर पूर्णपणे सुदृढ आणि निरोगी आहेस हे रिपोर्ट मध्ये दिसलं की लगेचच आपण लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशनला सुरूवात करू शकतो. *या ऑपरेशनद्वारे खराब झालेले निकामी यकृत पुर्णपणे काढून त्या जागी नवीन निरोगी यकृताच्या काही भागाचे प्रत्यारोपण केले जाते* आपण हीच प्रोसेस फॉलो करणार आहोत” डॉक्टर देशमुख यांनी स्पृहाचा निग्रह पाहून तिला सविस्तर माहिती दिली.अत्यंत महत्त्वाचे आणि लहानसहान तपशील पण बारकाव्यांनिशी समजावले.
इकडे स्नेहाची अवस्था द्विधा झाली होती आईला आधार द्यावा की बाबांना सावराव, ते तिचं तिलाच कळेना. आणि त्यावेळी स्पृहा मात्र तिला एकदम प्रगल्भ आणि अत्यंत विवेकी समजूतदार आणि ‘थोरही’वाटू लागली.
घरी परत आल्यावर जवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया चक्रावून टाकणाऱ्या होत्या. वासंती ताईंची मावशी म्हणाली, ” वासंती, जयंतरावांच्या डोळ्यादेखतच बाई ग, स्पृहाच्या डोक्यावर अक्षता पडल्या म्हणजे बरं ;मला काही लक्षण बरी दिसत नाहीत हो!”
प्रत्येक वेळी फुकटचे सल्ले देणाऱ्या या माई आजीचा फोनवरचा सल्ला ऐकून नेहमी प्रमाणे स्पृहाला मनस्वी राग आला. आई,तू ना तिचा नंबर ताबडतोब ब्लॉक करून टाक बर.!ती जोरात ओरडली.
घरात रोजच घरकामाला येणाऱ्या शांताबाई म्हणाल्या ,”स्पृहा ताईंना काही गोडधोड खायचं असेल तर सांगा वहिनी, मी स्वतः करून आनेन.उगाच मागून रुखरुख नको.”
हे ऐकून तर वासंतीचे अक्षरशः धाबं दणाणलं. उगीच काहीतरी नको बोलू शांता ,आत्ताच सांगते ,कधीही न चिडणारी वासंती तिच्यावर जोरात ओरडली.
” बाप मुलीच्या जिवावर उठलेला नव्हता हो कधी पाहायला इतक्या सुशिक्षित घरात”, शेजारच्या काळे आजींनी तेव्हड्यात अकलेचे तारे तोडलेच. त्यावर स्नेहा जोरात ओरडली,” आजी तुम्ही उगीच काहीतरी भरवू नका आईचा मनात! प्लीज तुमचं तुम्ही बघा. आमची काळजी घ्यायच्या नावाखाली फुकटचा मनस्ताप कशाला देताय? आई ,कशाला हवे असले शेजारी? “
इकडे स्नेहाला सुद्धा घरीदारी सतत हजारो प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं. पण ते सगळं ती संयम ठेवून सांभाळत होती .रोज स्वतःलाच बजावत होती.धीर सोडायचा नाही.सगळं काही नीट होईल.
स्पृहा ला मात्र जागेपणी नाही पण झोपेत चित्र-विचीत्र भास होत होते. पण निग्रहाने तिन त्यावर मात केली.कारण डॉक्टर देशमुखांवर आता तिचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी अगदी पहिल्यापासून *पूर्ण उपचारादरम्यान दाखवलेली पारदर्शकता ,संपूर्ण इत्यंभूत माहिती, बारीकसारीक तपशीलही सविस्तर* सांगण्याची त्यांची सवय तिला आता माहीत झाली होती. यावरून तिचा मानसशास्त्रीय दृष्टिकोण तिला सांगत होता की घाबरू नकोस,” बोथ ऑफ यू आर इन व्हेरी सेफ हँडस “. आणि ती जराशी निर्धास्त झाली.संपूर्ण शास्त्रीय माहिती तिला सांगितली गेली होती.
प्रत्यक्ष लिव्हिंग लिव्हर डोनर तीही स्वतःची मुलगी…एक विलक्षण उच्च अनुभूती होती ती..जयंतराव आणि वासंतीताईंसाठी सुद्धा. लिव्हर ट्रान्सप्लांट ची तारीख उजाडली. ते शेजारीच असलेल्या दोन ऑपरेशन थेटर मध्ये आणि दोघांच्याही ऑपरेशनला एकाच वेळी सुरुवात झाली.
तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाबांनी तिच्यावर वेळोवेळी दाखवलेला विश्वास, तिला केलेला मार्गदर्शन, उत्तम मार्क मिळूनही सायकॉलॉजी सारख्या विषयातच करिअर करण्यासाठी तिला दिलेला भक्कम पाठिंबा, तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून दिलेली कौतुकाची थाप, प्रोहोत्सान सगळं सगळं तरळून गेलं. आणि आता बाबांसाठी काहीतरी करायची वेळ आपली आहे. असा विचार करून स्थिर मनाने तिने डॉक्टरांना सहकार्य केलं .पूर्ण भूल दिल्याने साधारण चार ते पाच तासांनी डॉक्टरांनी तिला ऑपरेशन उत्तम झाल्याचं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट ॲक्शन म्हणजे यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचं सांगितलं. तिच्या नंतर तीन चार तासात जयंतरावांची शस्त्रक्रियाही सुखरूप पार पडली. स्नेहाला परत बाबांच्या आयुष्याला ,आनंदाला
आणि बरोबरीन दारात फुललेल्या बागेला फुटलेली नवीन तजेलदार **पालवी**अत्यंत खोलवर सुखावणारी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी वाटत होती.
आज संपूर्ण घराला रोषणाई केली होती. जाई ,जुई ,चाफा, प्राजक्त याला अक्षरशः नवा बहर आलेला होता. नुकतीच टेबल टेनिस मध्ये मिळवलेले ट्रॉफी शोकेस मध्ये अगदी झोकात मिरवत होती.
आणि अत्यंत उत्साहात मोजक्याच पण जवळच्या नातेवाईक आणि मित्र परिवारांना बोलावून ठरल्याप्रमाणे जयंतरावांच्या विवाह बंधनाचा तिसावा वाढदिवस झोकात साजरा होत होता.
वीस वर्षांपूर्वी दुसरी पण मुलगीच झाली म्हणून नाक मुरडणारी आजी या समारंभात मात्र ज्याला त्याला आपल्या नातीच कौतुक सांगताना थकत नव्हती. मुलगा सून या दोघांना पंचारती ओवाळून झाल्यानंतर, आवर्जून आजीनं स्पृहाचाही दृष्ट काढली. जयंतराव आणि त्यांची लाडकी स्पृहा दोघेही आता पहिल्या सारखे अत्यंत उत्साही,आनंदमय आणि निरामय आयुष्य जगत होते.
आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास आयोजित केलेल्या या सोहळ्यात स्पृहा ने एक उत्कृष्ट नृत्य सादर करून सर्वांची वाहवा तर मिळवलीच.आणि आजीच्या मनात मात्र एकच भावना दाटून राहिली होती *आपल्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला वडिलांनाच पुनर्जन्म भेट देणारी दुसरी लेक त्यांनी त्यांच्या हयातीत पाहिलीच नव्हती*.
शब्दांकन: *क्षितिजा आगाशे*
*मो. *9881095563
*तुम्ही ही कथा वाचलीत की आवर्जून सगळ्यांना पाठवा. फेसबुक ,व्हॉट्स ॲपवर फॉरवर्ड करा.आणि ह्या ‘लिव्हर डोनेशन जनजागृती अभियानात’ एक महत्त्वपूर्ण योगदान द्या.एका नवीन वैज्ञानिक दानाने एका आयुष्याला नवसंजीवनी द्या*.
ही नम्र विनंती*
To Book an Appointment
Contact:- +91 915 888 3611
Mail Id:- drninaddeshmukh@yahoo.com
Website:- www.organtransplantpune.com
Mail Id:- drninaddeshmukh@yahoo.com
Website:- www.organtransplantpune.com